breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमनोरंजनराजकारणलेखसंपादकीय

भोसरीत महेशदादा; चिंचवडमध्ये शंकरभाऊ : भाजपाच्या जोडीचा ‘दहीहंडी जल्लोष’

राजकीय वर्तुळात दोन्ही नेत्यांची ‘हवा’ : राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीत शांतता

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

राज्यातील सत्ताबदल आणि लांबणीवर पडलेल्या निवडणुका यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय वर्तुळात कमालीची शांतता आहे. मात्र, भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे आणि शहराध्यक्ष शंकर जगताप जोडीने दहीहंडी उत्सवाच्या निर्मित्ताने अक्षरश: ‘हवा’ केली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शहरातील राष्ट्रवादीत दोन गट पडले. त्यामुळे अजित पवार समर्थक प्रभावशाली गट शांत भूमिकेत आहे. भाजपाविरोधात आवाज उठवणारे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आता महायुतीच्या धर्माचे पालन करावे लागत असल्यामुळे संयमाच्या भूमिकेत आहेत. दुसरीकडे, महाविकास आघाडी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची आक्रमकताही कमी आहे. मराठा आंदोलन आणि आरक्षणाच्या मुद्यावर विरोधी पक्षाकडून महायुतीला ‘लक्ष्य’ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्याचा अपेक्षीत प्रभाव दिसत नाही. किंबहुना, पिंपरी-चिंचवड बंद बाबतही अद्याप सर्व विरोधी पक्षांमध्ये एकवाक्यता दिसत नाही. राज्यात ‘इंडिया’ आघाडी प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये तसे चित्र नाही.


दुसरीकडे, महापालिका निवडणुका अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या माननीयांनीही दहीहंडी उत्सवासाठी हात आखडता घेतला आहे. एकूणच कार्यक्रम, उत्सव आणि उपक्रमांवर खर्च करण्याची मानसिकता दिसत नाही. त्याचे पडसाद दहीहंडी उत्सवावर दिसले. मानाच्या मंडळांनीसुद्धा मोजक्या सेलिब्रेटींच्या उपस्थितीत कार्यक्रम आटोपता घेतला. यंदाच्या उत्सवामध्ये राष्ट्रवादी, शिवसेना किंवा अन्य विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मनमुराद जल्लोष पहायला मिळाला नाही.
याउलट, चिंचवड विधानसभा मतदार संघात भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप आणि भोसरी विधानसभा मतदार संघामध्ये भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी बाजी मारली. दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांनी ठेका धरला आणि वातावरण जल्लोषाचे केले. त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला.

भोसरीतील प्रमुख उत्सव…

भोसरी येथील पी.एम.टी. चौक येथे श्री भैरवनाथ दहीहंडी उत्सव समितीच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आली. यावेळी कुस्ती व बैलगाडा शर्यत यावर आधारित मराठी चित्रपट ‘‘रांगडा’’ चा टिझर रिलिझ करण्यात आला. मोशी येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जय गणेश युवा फाउंडेशनच्या पुढाकाराने नागेश्वर महाराज दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. चिखली घरकुल मेन सर्कल येथे निलेशदादा नेवाळे सोशल फाउंडेशन व शिवरक्त प्रतिष्ठान आणि मल्हार वाद्यपथक आयोजित दहीहंडी उत्सव झाला. संत तुकारामनगर, भोसरी येथील वसंतनाना लोंढे प्रतिष्ठाच्या वतीने पिंपरी-चिंचवडमधील पहिला महिला सार्वजनिक दहीहंडी उत्सव दिमाखात साजरा झाला. यावेळी क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तूत ‘‘गोपिकांसंगे खेळ रंगला पैठणीचा’’ कार्यक्रम झाला. भोसरीतील कार्यक्रमामध्ये आमदार महेश लांडगे यांनी ‘जय श्रीराम’चा नारा देत गोविंदाच्या गाण्यांवर ठेका धरला.

चिंचवडमधील प्रमुख उत्सव…

भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तसेच पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवामध्ये शहराध्यक्ष शंकर जगताप सहभागी झाले. तसेच, आकुर्डी येथील कैलास कुटे यांच्या वतीने आयोजित भव्य दहीहंडीचे उत्योसवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाच्या वेळी स्वराज्य ढोलताशा पथकाच्या वतीने वादन करण्यात करण्यात आले. तसेच डीजे व आकर्षक रोषणाईच्या तालावर तरुणाई थिरकत होती. सहकाऱ्यांसह डीजेच्या तालावर नृत्य करण्याचा करण्याचा आनंद जगताप यांनी घेतला. यासह वाल्हेकरवाडी येथे माजी महापौर सचिन चिंचवडे यांनी आयोजित केलेल्या उत्सवातही शंकर जगताप यांनी सहभागी होत गोविंद पथकांचा उत्साह वाढवला. यासह चिंचवडमधील सर्वाधिक दहीहंडी उत्सवांना शंकर जगताप यांनी उपस्थित दर्शवली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button