breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पवना धरणात 90 टक्के पाणीसाठा; पण शहरवासियांना दिवसाआड पाणी पुरवठा

भाजपच्या सत्तेत पिंपरी चिंचवडकरांना एक वर्षापासून दररोज होत नाही पाणीपुरवठा

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणा-या पवना धरणात 90 टक्क्याहून अधिक पाणीसाठा झाला आहे. यामुळे आता पुढील वर्षभराच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. मात्र, शहरवासियांना गेल्या एक वर्षापासून दिवसाआड पाणी पुरवठा सुरु आहे. धरणात पाणीसाठा असूनही पिंपरी चिंचवडकरांना दररोज पाणी पुरवठा कधी होणार? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होवू लागला आहे.

पिंपरी चिंचवड शहरासह मावळ परिसरात पाणी पुरवठा करणारे पवनाधरण आज (सोमवारी) सकाळपर्यंत 89.29 टक्के भरले होते. पवना धरण परिसरात सोमवारी पावसाचा जोर कमी-अधिक झाला आहे. मात्र डोंगर भागातून धरणात पाण्याचे प्रवाह येत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होवू लागली आहे.

गेल्या 15 ते 20 दिवस पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच मावळ तालुक्‍यातील विविध भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली. मागील वर्षी आजच्या तारखेपर्यत पवना धरणात 100 टक्के इतका पाणीसाठा झाला होता. यावर्षी आज सोमवारपर्यत पवना धरण परिसरात एकूण 1400 मिमी पावसाची नोंद झाली. आजमितीस धरणातील पाणीसाठा 89.29 टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे. तर 1 जूनपासून धरणाच्या पाणीसाठ्यात 52.66 टक्‍के वाढ झाली आहे. पावसाचा जोर कमी झाला तरीही धरण शंभरी गाठणार हे निश्चित असून वर्षभराची नागरिकांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

भाजपच्या सत्तेत सुरळीत पाणी पुरवठा कधी?

पिंपरी चिंचवड महापालिकेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. गतवर्षी पवना धरण शंभर टक्के भरले होते. मात्र, पाण्याची पातळी खलावत गेल्याने शहरवासियांना दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिका पाणी पुरवठा विभागाकडून मे 2019 पासून काही महिने वगळता आजपर्यंत नागरिकांना दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे गेल्या एक ते दीड वर्षापासून नागरिकांना दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. याविषयी सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी तसेच विरोधकांकडून कोणी चक्कार शब्द काढायला तयार नाही. सध्यस्थितीत कोविड-19 काळात पाण्याचा अधिक वापर होतोय, तरीही दररोज पाणी पुरवठा केला जात नाही. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांच्या धरण उशाला अन्ं कोरड घशाला अशी गत झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button