breaking-newsआंतरराष्टीय
कीकी चॅलेंजनंतर आता नवीन ट्रेंड ‘ड्रॅगन ब्रेथ’
कीकी चॅलेंजची सध्या संपूर्ण जगभरात लाट चालू आहे. त्यामुळे अनेक पालक आणि पोलीस तर त्रस्त आहेत. किकी चॅलेंजनंतर आणखी नवीन एक ट्रेंड पालक आणि पोलिसांची डोकेदुखी ठरणार आहे, तो म्हणजे ‘ड्रॅगन ब्रेथ’.
हा एक कॅण्डीचा प्रकार असून या ही कॅण्डी लिक्विड नायट्रोजन या रासायनिक पदार्थांत भिजवून ठेवली जाते. ज्यावेळेस याचा संपर्क जीभेसोबत होईल तेव्हा त्यातून खुप सारा वायू बाहेर पडतो. त्यामुळे याला ‘ड्रॅगन ब्रेथ’ असे नाव देण्यात आले आहे.
या नवीन ट्रेंडचे देखील अनेक शिकार होत आहते, ज्यावेळी ही कॅण्डी जिभेवर ठेवली जाते तेव्हा अनेकदा त्याच्यातील रासायनिक प्रकियेमुळे तोंडातील आतल्या भागाला जखमा होऊ शकतात. त्यामुळे पालक हा नवीन ट्रेण्ड आपली मुले करू नयेत म्हणून खूप जागरूक आहेत.