breaking-newsराष्ट्रिय
कितीही विरोध करा, सरकार झुकणार नाही; अमित शहा
नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन देशातलं वातावरण पेटल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. अल्पसंख्यांक शरणार्थींना आमचं सरकार नक्कीच नागरिकत्व देईल. विरोधकांना राजकारण करायचं असेल, तर त्यांनी जरुर करावं. भाजपा आणि मोदी सरकार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं शहा यांनी म्हटलं.