breaking-newsराष्ट्रिय

काश्‍मीरात फुटीरवाद्यांचा आज बंद

श्रीनगर – पत्रकार बुखारींची हत्या आणि सुरक्षादलांकडून नागरीकांची गेल्या काही दिवसांमध्ये झालेली हत्या याच्या निषेधार्थ फुटीरवादी संघटनांनी आज काश्‍मीर खोऱ्यात पुर्ण बंद पुकारला आहे. फुटीरवादी संघटनांच्यावतीने एकत्रित निवेदन प्रसिद्धीला देऊन ही घोषणा करण्यात आली आहे. बुखारींच्या हत्येच्या प्रकरणाची आंतरराष्ट्रीय स्तरावरून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

सुरक्षा जवानांनी काश्‍मीर खोऱ्यातील नागरीकांचेही हत्यासत्र सुरू केले असून ते त्वरीत थांबवण्यात यावे व आत्तापर्यंत झालेल्या या हत्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान फुटीरवाद्यांनी पुकारलेल्या या बंदच्या पार्श्‍वभूमीवर काश्‍मीर खोऱ्यात सर्वत्र चोख बंदोबस्त तैनात केला जात आहे. राज्यातील सरकारने नुकताच राजीनामा दिला असल्याने त्या पार्श्‍वभूमीवर काश्‍मीरात निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्‍वभूमीवर उद्याच्या बंदच्या तणावाची भर पडली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button