breaking-newsराष्ट्रिय
काश्मीरात दोन गनिम ठार
श्रीनगर – जम्मू काश्मीरातील बंदीपुरा भागात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दोन गनिम ठार झाले. केंद्र सरकारने कालच काश्मीरातील शस्त्रसंधी मागे घेतल्याची घोषणा होती त्याच्या दुसऱ्याच दिवशी ही कारवाई करण्यात आली.
लष्करी सूत्रांनी सांगितले की बंदीपुरा जिल्ह्यात गनिमांचा वावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही तेथे त्यांच्या विरोधात मोहीम हाती घेतली त्यावेळी झालेल्या चकमकीत हे गनिम ठार झाले. त्या जिल्ह्यातील ऑपरेशन अजून सुरूच आहे.
तथापी तेथे नेमके किती गनिम लपले आहेत याची माहिती मिळालेली नाही. काश्मीर खोऱ्यात गनिमांची घुसखोरी थांबवण्यासाठी ठिकठिकाणी लष्कराने चेकपोस्ट उभारल्या आहेत. पोलिस व अन्य यंत्रणांनी रॅंडम पद्धतीने तेथील वाहनांच्या तपासणीचेही काम हाती घेतले आहे.