breaking-newsताज्या घडामोडी

#CoronaVirus: सोलापूर शहर पोलीस दलात खळबळ

धक्कादायक बाब म्हणजे एकाचवेळी नऊ पोलिसांनाही करोनाची बाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यात सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी भागातील संजीवनगरासह गजानन नगर (जुळे सोलापूर), बजरंगनगर (होटगी रोड), सम्राट चौक, मंत्री-चंडक नगर (भवानी पेठ), रविवार पेठ, मुरारजी पेठ पोलीस वसाहत तसेच जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील पाटकूल, ढोक बाभुळगाव आदी ठिकाणी राहणाऱ्या पोलिसांचा समावेश आहे.

आतापर्यंत एकूण १६ पोलीस करोनाबाधित झाल्याने पोलीस यंत्रणाही हादरून गेली आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात मोहोळ व सांगोला येथे दोन करोनाबाधित रूग्ण यापूर्वी सापडले होते. त्यानंतर आता मोहोळ तालुक्यात पुन्हा तीन रूग्ण आढळून आले आहेत. बहुसंख्य रूग्ण एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे करोनाबाधित झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button