breaking-newsराष्ट्रिय

माझ्या पुत्राच्या मृत्यूचा बदला घ्या, दहशतवाद्यांना संपवा – शहीद औरंगजेबचे वडील

जम्मू (जम्मू-काश्‍मीर) – माझ्या पुत्राच्या मृत्यूचा बदला घ्या,दहशतवाद संपवा असे आवाहन शहीद जवान औरंगजेबच्या पित्याने लष्करप्रमुखांना केले आहे. 14 जून रोजी दहशतवाद्यांनी अपहरण करून हत्या केलेल्या जवान औरंगजेब याच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी लष्करप्रमुख बिपिन रावत गेले होते. त्यांनी औरंगजेबला श्रद्धांजली वाहून त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

32 तासांच्या आत माझ्या पुत्राच्या हत्येचा बदला घ्या आणि दहशतवाद्यांना नष्ट करा असे आवाहन शहीद जवान औरंगजेब याच्या पित्याने लष्करप्रमुखांना केले.

सुटी घेऊन ईद साजरी करण्यासाठी जाणाऱ्या 44 राष्ट्रीय रायफल्सचा जवान औरंगजेब याचे पुलवामा येथून दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. त्याच संध्याकाळी औरंगजेबचा मृतदेह श्रीनगरमध्ये सापडला होता. गोळ्या घालून त्याची हत्या करण्यात आली होती. हिजबूल कंमांडर समीर टायगरला चकमकीत मारणाऱ्या गटामध्ये औरंगजेबचा समावेश होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button