breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus: कोरोनाची दहशत चित्रीकरणाला, गुरुवारपासून 31 मार्चपर्यंत सर्व शूटिंग रद्द

मुंबई | महाईन्यूज

कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता येत्या गुरुवारपासून 31 मार्चपर्यंत सिनेमा, छोटा पडदा, वेबसिरीज, जाहिराती या सर्व मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घटकांचे संपूर्ण चित्रीकरण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी मुंबईत फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज, इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन, इंडियन फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोशिएशनच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे दररोज कोट्यवधी रुपयांचे नुकसान निर्मात्याला होणार असून, या क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या अनेक कामगारांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून बुधवारी या साथीला महारोगराई घोषित करण्यात आली होती. भारतातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर सिनेक्षेत्राशी संबंधित असणाऱ्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. सिनेमांचे, मालिकांचे दिवस रात्र सुरू असणारे चित्रीकरण आणि या चित्रीकरणात दररोज एका ठिकाणी अनेक लोक एकत्र काम करत असतात. या गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा प्रसार झटपट होऊ शकतो. त्यामुळे यावर नियंत्रण राहावे म्हणून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे, असे निर्माते अशोक पंडित यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे. याचा परिणाम मराठी सिनेमा आणि डेलीसोप यांच्या चित्रीकरणावरही पडणार आहे . येत्या 2 दिवसांत आधी ठरविल्याप्रमाणे राहिलेले चित्रीकरण पूर्ण करून गुरुवारपासून 31 मार्चपर्यंत संपूर्ण चित्रीकरणाला ब्रेक देण्यात येणार आहे . यामुळे येत्या गुरुवारपासून गोरेगाव चित्रनगरी, मढ, ठाणे, मिरारोड या भागातील स्टुडिओ , बंगले यातील चित्रीकरण संपूर्णपणे ठप्प होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button