breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

Pune : आषाढी वारीच्या पालखीमुळे पुणे विद्यापीठाने परीक्षा ढकलल्या पुढे

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडत आहे. १२ जून आणि १३ जूनला पालखीचा पुण्यात मुक्काम आहे. या पालखीनिमित्त पुणे विद्यापीठाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे विद्यापीठाने पालखी दरम्यान असणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षांचं वेळापत्रक विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध केले जाईल.

याशिवाय सासवड परिसरात १४ जून ते १६ जून दरम्यान होणाऱ्या पालखी मिरवणुकीमुळे नियमित परीक्षेला बसू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे.

हेही वाचा – Health Tips : उन्हाळ्यात लिंबू-पाणी पिताय, तर होतील ‘हे’ फायदे..

विद्यापीठातील परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना या बदलांची माहिती दिली. मार्च २०२३ च्या उन्हाळी सत्र परीक्षा ६ जून रोजी सुरु झाल्या आणि मूळ परीक्षेचे वेळापत्रक आधीच जाहीर केले होते.

मात्र काही महाविद्यालयांच्या विनंतीचा विचार करुन विद्यापीठाने पुणे शहरातून पालखीचे प्रस्थान होण्याच्या अनुषंगाने १२ आणि १३ जून रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे वेळापत्रक पुन्हा प्रकाशित करण्यात येणार आहे. सुधारित परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित केले जाईल जेणेकरुन विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात सगळी माहिती मिळणार आहे. पालखी मिरवणुकीमुळे जे विद्यार्थी नियमित परीक्षेला बसू शकत नाहीत ते विशेष परीक्षा देण्यास पात्र असतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button