breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कार्यकारी अभियंत्यांच्या पदोन्नतीवर गंडांतर; न्यायालयीन दाव्याची दडविली माहिती

कार्यकारी अभियंता पदावरील पदोन्नती बेकायदेशीर; विधी समितीसमोर प्रस्ताव

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड महापालिकेचे बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांनी पदोन्नती घेताना न्यायालयीन दाव्याची माहिती दडविली आहे. त्यांच्यावर उच्च न्यायालयात स्थापत्य विभागातील निष्कृष्ट कामे व भ्रष्टाचार केल्याचे आरोप आहे. त्यानूसार हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आहे. परंतू, सदरील माहिती त्यांनी पदोन्नती घेताना दडविली असून त्यांची पदोन्नती बेकायदेशीर आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा उपअभियंता पदावर पदावतन करावे, याविषयी प्रस्ताव विधी समिती सभेपुढे ठेवण्यात आला आहे.

महापालिकेच्या विधी समितीसमोर 1 जानेवारी 2021 रोजी होणा-या सभेपुढे हा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे त्यांना दिलेली पदोन्नती बेकायदेशीर असून न्यायालयीन दाव्याची माहिती दडविण्यात आली आहे. त्यावर विधी समितीत विचारविनिमय करुन दिलेल्या पदोन्नतीवर निर्णय घेण्यात येणार आहे.

बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र वसंतराव राणे यांचेवर सन 2015 मध्ये चिखलीचे सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंदे यांनी न्यायालयात दावा दाखल केला आहे. सदरील दावा स्थापत्य विषयक महापालिकेच्या फ प्रभागातंर्गत जी कामे केलेली आहेत. त्यातील भ्रष्टाचार आणि निष्कृष्ट दर्जाची कामे केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. न्यायालयाने कलम 202 नूसार राणे यांचे चाैकशीचे आदेश दिलेले आहेत. तसेच महापालिका प्रशासनाकडे चाैकशी करुन अहवाल मागितलेला आहे. परंतू, प्रशासनाने अद्यापही चाैकशी अहवाल दिलेला नाही.

त्यामुळे सदरील प्रकरणाचा दावा न्यायालयात प्रलंबित आहे. परंतू, हा दावा न्यायालयात प्रलंबित असतानाही राणे यांना उपअभियंता पदावरुन कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नती देण्यात आली. पण पदोन्नती समितीला प्रशासनाने न्यायालयीन माहिती न देता अंधारात ठेवल्याचे दिसत आहे.

दरम्यान, कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांनी न्यायालयीन दाव्याची माहिती दडवून पदोन्नती समितीला अंधारात ठेवत पदोन्नतीचा लाभ घेतला आहे. त्यामुळे ही पदोन्नती बेकायदेशीर आहे. त्यांचे पुन्हा उपअभियंता पदावर पदावतन करणे आणि त्यांची नियुक्ती स्थापत्य विभागात करणे. यावर विचारविनिमय करण्यासाठी हा प्रस्ताव विधी समितीच्या सभेपुढे ठेवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button