breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अंडरपासचा वाढीव खर्च अभियंते व सल्लागारांकडून वसूल करा

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे विनोद कांबळे यांची मागणी
  • आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले निवेदन

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बिजलीनगर येथील अंडरपासचे काम गेल्या कित्येक महिन्यांपासून रखडले आहे. त्यावर अतिरिक्त काम झाल्याचे दाखवून साडेचार कोटींचा खर्च पालिकेकडून वसूल करणा-या ठेकेदारावर कारवाई करावी. अंडरपासचा वाढीव खर्च पालिकेचे अभियंते आणि सल्लागाराकडून वसूल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विनोद कांबळे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात कांबळे यांनी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, बिजलीनगर येथील गुरूद्वारा चौकाकडे जाणा-या अंडरपासचे काम रखडले आहे. हे काम मे. कृष्णाई इन्फ्रस्ट्रक्चर प्रा. लि. या ठेकेदारास दिले आहे. दोन वर्षात हे काम पूर्ण करण्यासाठी 14 कोटी 25 हजाराचा खर्च निविदेद्वारे करण्यात आला आहे. एवढा निधी खर्च केला असताना संथगतीने व बेजबाबदारपणे काम केल्यामुळे अद्याप हे काम अपूर्णच आहे. आता वाढीव खर्च झाल्याचे दाखवून 4 कोटी 66 लाख 48 हजार एवढा वाढीव खर्चाचा प्रस्ताव सदस्यांच्या माध्यमातून आणला आहे. त्याला काल बुधवारी (दि. 30) स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

मुदतीत काम न केल्यामुळे कामचुकार ठेकेदाराला 4 कोटी 66 लाखांची बक्षिसी दिली जातेय का ?, ठेकेदार पालिकेचा जावई आहे का ? असा सवाल कांबळे यांनी उपस्थित केला आहे. वाढीव खर्च पालिकेचे अभियंते आणि सल्लागारांकडून वसूल करण्यात यावा. नागरिकांच्या पैशांची होणारी लूट थांबवावी, अशी मागणी कांबळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button