breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

कार्यकर्त्यांला ‘आमदार झाल्या सारखं वाटतंय’ ; पिंपरी-चिंचवडसह भोसरीत डमी आमदारांचा हैदोस

पोलिसांचे कारवाईकडे दुर्लक्ष ः कार्यकर्त्यांना नेत्यांचे अभय 

पिंपरी – पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघात असंख्य फोर व्हीलर वाहनावर “महाराष्ट्र विधानसभा आमदार” अशा आशय असलेल्या चिन्हांचे स्टिकर लावून ‘मला आमदार झाल्या सारखं वाटतंय’ तोरा मिरवला जात आहे. तसेच शहरात काही नगरसेवक व कार्यकत्यांच्या गाडीवरती “महाराष्ट्र विधानसभा आमदार” अशा आशयाचे चिन्हे सर्रास वापरली जावू लागली आहे. याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले असून आमदारांनीही कार्यकर्त्यांना अभय दिल्याचे दिसून येत आहे.

पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात अनेक महागडी वाहने राजकीय पुढारी, त्याचे नातेवाईक, कट्टर कार्यकर्ते  आमदारांचे लोगो वापरुन अवैध कामे करु लागले आहेत. काही स्वंयघोषित कार्यकर्त्यांनी आपल्या गाडीवर “महाराष्ट्र विधानसभा आमदार” लोगो लावून पिंपरी-चिंचवडमध्ये फिरताना दिसत आहेत.  शहरात आमदारांच्या गाड्यांना लावले जाणारे विधानसभा सदस्य हे स्टिकर सध्या कोणीही आपल्या गाड्यांना लावून फिरत आहे. शहरात विधानसभा मतदार संघ असे स्टिकर लावून फिरणार्‍या डमी आमदारांची संख्या वाढू लागली आहे. आपली आमदाराशी जवळीक आहे किंवा आमदार आपल्या खिशातच आहे, हे दाखविण्यासाठी हे स्टिकर मिळविण्यासाठी आमदारांचे नातेवाईक, मित्र आणि कार्यकर्त्यांचा आटापिटा चालला आहे.

काही दिवसापुर्वी देहूरोड वाहतूक शाखेच्या पोलिसांनी रावेत येथील डी.वाय कॅालेजसमोर आमदार लोगो असलेली गाडी पकडली, पण काहीतरी तोडपाणी करुन ती गाडी सोडून दिल्याचे चर्चा आहे. परंतू, त्या गाडीची शहरभर चर्चा रंगली होती. तसेच शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघात अशा गाड्यांचा वावर सर्वाधिक आहे. कायद्याने हे चुकीचे असुनही पोलिस त्यांच्याकडे कानाडोळा करु लागले आहेत. त्या डमी आमदारांवर पोलिस कारवाई करत नसल्याने त्याचे फावले आहे. त्या कार्यकर्त्यांना आमदारांचे अभय मिळाल्याने ते धाडस करु लागल्याचे दिसून येत आहे.

याबाबत परिमंडल तीनचे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांना बी.आर.आंबेडकर ग्रुपच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. त्यात म्हटले आहे की, ‘ शहरातील अनेक वाहनांवर ‘ महाराष्ट्र विधानसभा सदस्य’ हे स्टीकर लावून फिरताना दिसत आहेत. या स्टिकरवर तीन सिंहांची राजमुद्रा असून शहरात 15 हून अधिक गाड्यांना असे स्टिकर लावलेले आहे. अल्टो ते  फॉर्चुनर या वाहनांवर हे स्टीकर दिसून येत. शहरात ‘डमी’ आमदारांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. असे स्टीकर शासनातर्फे छापून दिले जात नाही, आमदार ते स्वत: छापून घेतात. त्यामुळे कुठल्याही वाहनावर अशाप्रकारचे स्टीकर लावणे बेकायदेशीर व चूकीचे आहे. मात्र, अशा वाहनांवर आणि वाहनधारकांवर कारवाई शहरात झालेली नाही. ती वाहने जप्त करुन वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे  केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button