breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

दिल्ली विधानसभा निवडणूक : ‘आप’ चे अरविंद केजरीवालच ठरणार निवडणुकीत ‘बाप’; भाजप पिछाडीवर तर काँग्रेसची ‘बत्तीगुल’

नवी दिल्ली । महाईन्यूज । ऑनलाईन टीम

संपूर्ण देशातील नागरिकांचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ‘हॅटट्ट्रीक’ करण्याच्या तयारीत आहेत. एकूण ७४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत तब्बल ५२ जागांवर आपचे उमेदवार आघाडीवर आहेत. दुसरीकडे भारतीय जनता पार्टी केवळ १८ जागांवर आघाडीवर दिसत आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला अद्याप खातेही उघडता आलेले नाही, असे कल दिसत आहेत.

आप -52 जागांवर तर भाजप 18 जागांवर आघाडीवर

  • निवडणूक आयोगाने 70 जागांसाठीचे कल जाहीर केले
  • मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देण्यात केजरीवाल यांच्यासमोर आम्ही कमी पडलो- सुधीर मुनगंटीवार
  • तिवारी यांनी भाजपला 48 जागा मिळतील, माझे ट्विट जपून ठेवा असे एक ट्विट केलं होतं
  • थोडं थांबा, मी अजूनही आशावादी आहे- मनोज तिवारी, दिल्ली भाजपचे अध्यक्ष
  • काँग्रेसला पुन्हा भोपळाच मिळण्याची शक्यता
  • निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कलांनुसार देखील आपला बहुमत मिळण्याची पूर्ण शक्यता आहे
  • आप 45 जागांवर तर भाजप 19 जागांवर आघाडीवर आहे
  • निवडणूक आयोगाने 70 पैकी 64 जागांचे कल जाहीर केले
  • आपचे 32 तर भाजपचे 16 उमेदवार आघाडीवर- निवडणूक आयोग
  • निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार आपच्या आघाडीवर असलेल्या उमेदवारांची संख्या 22 वरून 26 झाली
  • नव्या आकड्यांनुसार आपचे 22 तर भाजपचे 14 उमेदवार आघाडीवर
  • निवडणूक आयोगाच्या आकड्यांमुळे आपमध्ये चिंतेचं वातावरण पसरायला सुरुवात
  • निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार आपचे 18 तर भाजपचे 11 उमेदवार आघाडीवर
  • निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार आप आणि भाजपचे प्रत्येकी 10 उमेदवार आघाडीवर
  • निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार आपचे 7 तर भाजपचे 6 उमेदवार आघाडीवर आहेत.
  • निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर कल जाहीर करायला सुरुवात झाली
  • ‘हा अहंकाराचा पराभव आहे’, दिल्ली निकालांवरून नवाब मलिक यांची भाजपवर टीका
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button