breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

सुझान खानची बहीण फराहची कोरोना टेस्ट आली निगेटिव्ह

मुंबई | संजय खानची मुलगी आणि सुझान खानची बहीण फराह खान अलीची कोरोनाव्हायरस टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यांच्या घरात काम करणा-या स्टाफमधील एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर फराहने मंगळवारी स्वत:ची आणि घरातील इतर सदस्यांची कोरोना चाचणी करुन घेतली.फराहने आपल्या ट्विटर अकाऊंटवर टेस्ट निगेटिव्ह आली, त्याविषयीची माहिती देताना लिहिले, “सर्व निगेटिव्ह, व्वा व्वा व्वा # कॉव्हिटेस्टिंग, देवाचा आशीर्वाद, आशा करते की, ज्यांना या व्हायरसची लागण झाली आहे, ते सर्वजण लवकरात लवकर बरे होतील. आशा आहे की, जे लोक या कठीण काळात इतरांना वाचविण्यात गुंतले आहेत ते सुरक्षित असतील. देव आपल्या ग्रहाचे रक्षण करो.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button