breaking-newsपिंपरी / चिंचवड

महिलांनी घेतले कापडी पिशव्या बनविण्याचे धडे

जळगाव | महाईन्यूज

जळगाव येथील वेदांत क्रिएशन्सच्या वतीने महिलांना कॉटनच्या कापडी पिशव्या बनविण्याचे मोफत प्रशिक्षण नुकतेच देण्यात आले.

प्लॅस्टिक बंदीवर पर्याय व पर्यावरणातील प्रदुषण कमी व्हावे, हाच एक उद्देश डोळ्यांसमोर ठेवून वेदांत क्रिएशन्सच्या वतीने कॉटनच्या कापडी पिशव्या बनविण्याचे एक दिवसीय प्रशिक्षण सोमवार (दि. 4 नोव्हेंबर) दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या कल्पना पाटील, विमल मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या संस्थापिका मीनल पाटील, वेदांत क्रिएशनच्या संस्थापिका शुभांगी चौधरी, संजय चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी काप़डी पिशव्यांचे वेगवेगळे प्रकाराचे प्रशिक्षण भारती कोल्हे व प्रतिभा देसले यांनी दिले.

सामाजिक कार्यकर्त्या कल्पना पाटील या महिलांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, सध्या राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय लागू करण्यात आल्यानंतर प्लास्टिकचा पर्याय म्हणून अनेक पर्याय पुढे  आल्याने महिलांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. कॅरीबॅगला पर्याय म्हणून अनेक प्रकारच्या कागदी व कापडी पिशव्यांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळेच अनेक महिलांना रोजगाराची नवीन संधी चालून आली आहे. ही संधी वेदांत क्रिएशनने महिलांसाठी उपलब्ध करुन दिली आहे. तरी या संधीचा फायदा महिलांनी घ्यावा, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

शुभांगी चौधरी म्हणाल्या की,  महिलांना सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यांना स्वावलंबी कसे करता येईल, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून वेदांत क्रिएशनच्या वतीने हे कापडी पिशवी बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाहुण्यांचे स्वागत शुभांगी चौधरी यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button