breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कामचुकार अधिका-यांमुळे रुपीनगरचा विद्युत पुरवठा तब्बल सात तास खंडीत

  • शिवसेना रुपीनगर विभागाच्या पदाधिका-यांनी घेतली दखल
  • अधीक्षक अभियंता तगलपल्लीवर यांनी दिले कारवाईचे आदेश

पिंपरी / महाईन्यूज

निगडी प्राधिकरण विद्युत विभागाचे सहायक अभियंता संतोष झोडगे आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता मिलिंद चौधरी यांच्या हलगर्जीपणामुळे रुपीनगरचा विद्युत पुरवठा तब्बल सात तास खंडीत राहिला. सकाळच्या सत्रातच हा खोळंबा झाल्यामुळे रुपीनगर, त्रिवेणीनगर, तळवडे भागातील ऑनलाईन परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित रहावे लागले. ‘बॅकफीड’ सप्लायने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची विनंती केल्यानंतरही झोडगे आणि चौधरी यांनी दखल घेतली नाही. अशा कामचुकार अधिका-यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी शिवसेना रुपीनगर विभागाच्या पदाधिका-यांनी केली. त्यावर अधीक्षक अभियंता पंकज तगलपल्लीवर यांनी याठिकाणी भेट देऊन संबंधीत अधिका-यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्रिवेणीनगर चौकातील विद्युत विभागाचा ओडी खराब झाल्यामुळे निगडी प्राधिकरणातील यमुनानगर भागाला विद्युत पुरवठा करणारा फिडर शनिवारी (दि. 7) सकाळी साडेआठ वाजता बंद पडला. त्यावर शिवसेना रुपीनगर विभागाच्या पदाधिका-यांनी तातडीने निगडी विभागाचे सहायक अभियंता झोडगे आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता चौधरी यांना कल्पना दिली. बराच वेळ झाला तरी कार्यस्थळावर कोणीच हजर झाले नाही. त्यानंतर भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता राहूल गवारी यांच्याकडे तक्रार केली. त्यावेळी कार्यस्थळावर केवळ दोनच कर्मचारी हजर होते. सकाळी साडेअकरा वाजता त्यांनी त्याठिकाणी येऊन पाहणी केली. त्यावेळी शिवसैनिकांनी मध्यमार्ग काढून ‘बॅकफीड’ सप्लाय पुर्ववत करण्याची विनंती केली. मात्र, ‘बॅकफीड’ केबल गेल्या सात ते आठ महिन्यांपासून खराब असल्यामुळे विद्युत प्रवाह पर्ववत होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सात ते आठ महिने ‘बॅकफीड’ केबलचा फॉल्ट काढला नसल्यामुळे दहा मिनीटात पुर्ववत होणारा सप्लाय दुरूस्त करायला तब्बल सात तास लागले. शनिवारी दुपारी अडीच वाजता विद्युत सप्लाय पुर्ववत करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या सध्या परीक्षा सुरू आहेत. तब्बल सात तास विद्युत पुरवठा खोळंबल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित रहावे लागले. औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या बंद राहिल्या. एवढे होऊन सुध्दा अधिकारी चौधरी कार्यस्थळावर आले नाहीत. शेवटी बोंडे यांनी पुणे विभागाचे अधीक्षक अभियंता पंकज तगलपल्लीवर यांच्याकडे तक्रार केली. शेवटी तगलपल्लीवर आणि कार्यकारी अभियंता गवारी यांनी रुपीनगरला भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, शिवसैनिकांनी संबंधित निष्क्रिय अभियंत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. अन्यथा महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास विद्युत विभागातील प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा शिवसेना विभागाच्या वतीने देण्यात आला.

त्यावर तगलपल्लीवर यांनी रुपीनगर-तळवडे भागाला विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या. विद्युत पुरवठा खंडीत होण्यास जबाबदार अधिका-यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिका-यांना दिले. तातडीने दखल घेतल्याबद्दल शिवसेना विभागाच्या वतीने तगलपल्लीवर यांचे अभार मानले. यावेळी विभाग प्रमुख नितीन बोंडे, शिवसेना शहर संघटक व सनियंत्रण समिती सदस्य संतोष सौंदणकर, शाखाप्रमुख प्रवीण पाटील, रमेश पाटोळे, नामदेव नरळे, अशोक जाधव, सुनिल शिंदे, अरुण थोपटे, अरुण ढाके, सुनील समगिर, अमित शिंदे, सहदेव चव्हाण आदी उपस्थित होते.    


आता नव्यानेच टॉवर लाईनजवळ ‘आरएमयू’ बसविला आहे. त्याठिकाणी दोन इनकमिंग एचटी सप्लाय आहेत. मात्र, एक इनकमिंग आणि चार आऊट गोईंग बसविले आहेत. त्याठिकाणी इनकमिंग एचटी केबल ‘आरएमयू’मध्ये न बसविता बाहेर ठेवली आहे. उद्या जर एक साइटची केबल खराब झाली, तर दुसरी केबल ‘आरएमयू’मध्ये न जोडल्यामुळे परिसरातील प्रवाह बंद राहण्याची शक्यता आहे. आमच्या भागातील विद्युत प्रवाह कायम सुरळीत ठेवण्यासाठी सक्षम अधिकारी नियुक्त करावा. नागरिकांना यापुढे खंडीत विद्युत प्रवाला तोंड देण्याची वेळ येणार नाही, याची खबरदारी विद्युत विभागाने घ्यावी.

नितीन बोंडे, शिवसेना विभागप्रमुख, रुपीनगर

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button