breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सांगवीत सांडपाणी वाहिन्यावरील चेंबरची ३५ लोखंडी झाकणे चोरीला

 पिंपरी – सांगवी परिसरात अंतर्गत रस्त्यावरील भुमिगत सांडपाणी वाहिन्यांच्या चेंबर वरील ३५ लोखंडी झाकणे गायब झाली आहेत. याबाबत महापालिकेच्या स्थापत्य विभागाने  सांगवी पोलिसात लोखंडी झाकणे गायब झाल्याची अज्ञाताविरूद्ध तक्रार दाखल केली आहे.

सांगवीतील प्रियदर्शनी नगर, सार्वजनिक बांधकाम वसाहत रस्ता, वेताळ महाराज मंदीर रस्ता आदी ठिकाणची चेंबरवरील लोखंडी झाकणे गायब झाली आहेत. उघड्या सांडपाणी वाहिन्यावरील चेंबर उघडे पडले होते. ते चेबर उघडे राहू नयेत म्हणून झाकणे लावली होती. परंतू, चेंबर लक्षात न आल्याने काही किरकोळ अपघात घडले आहेत. याबाबत मनसेचे राजु सावळे यांनी  स्थापत्य विभागाकडे तक्रार केली होती.

स्थापत्य विभागाकडुन चेंबरची पाहणी केल्यावर ३५ चेंबर उघडे असल्याचे लक्षात आले.  उघड्या चेंबरवर स्थापत्य विभागाकडुन आता लोखंडी जाळी ऐवेजी आरसीसी सिंमेंटची झाकणे बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. गायब झालेल्या लोखंडी झाकणाबाबत स्थापत्य कनिष्ठ अभियंता सचिन सानप यांनी सांगवी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत महापालिकेचे स्थापत्य विभागाचे प्रवक्ते शिरीष पोरेड्डी म्हणाले की, भूमिगत सांडपाणी वाहिन्यावर आम्ही बसवलेली लोखंडी झाकणे गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. यावर नागरीकांनी लक्ष ठेवुन संबंधिताविषयी माहिती देण्याचे सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button