breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर भाजप नेत्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटमध्ये मोठा बदल

Modi ka Pariwar | पंतप्रधान नरेंद्र मोदी घराणेशाहीवर फार बोलत आहेत. पण त्यांच्याकडे कुठलंही घराणं नाही, अशी टीका लालूप्रसाद यादव यांनी केली. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संपूर्ण देश माझे कुटुंब आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांची ट्वीटर वरील प्रोफाइल बदलले आहेत. त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट X (ट्विटर)वर मोदी का परिवार असा उल्लेख करण्यात आला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रोफाईलमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यांच्या नावापुढे ‘मोदी का परिवार’ असा उल्लेख करण्यात आला आहे. भाजपच्या इतर बड्या नेत्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही हा बदल पाहायला मिळतोय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याही प्रोफाईलमध्ये हा बदल पाहायला मिळतोय.

हेही वाचा      –      वायसीएम रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, निवासी डॉक्टर संपावर 

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

माझ्या कुटुंबामुळे मला लक्ष करण्यात आले, पण आता संपूर्ण देश म्हणतोय की मी मोदींचा परिवार आहे. घराणेशाही पक्षाचे चेहरे वेगवेगळे असू शकतात परंतु वर्ण एकच आहे. त्यांच्या चारित्र्यामध्ये दोन खात्रीच्या गोष्टी आहेत. एक खोटे बोलणे आणि दुसरी दरोडा. माझे जीवन हे एक खुले पुस्तक आहे. देशवासियांसाठी जगेन हे स्वप्न घेऊन मी बालपणी घर सोडले. तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी माझे आयुष्य घालवीन. देशातील कोट्यवधी जनता मला आपले मानते. १४० कोटी देशबांधवांनो, हे माझे कुटुंब आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button