breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

कामगारांच्या वेतनासाठी उद्या महामेट्रोच्या कार्यालयावर धडक मोर्चो

  • महामेट्रोच्या फुगेवाडी कार्यालयास टाळे ठोकणार

पिंपरी ( महा ई न्यूज ) – महामेट्रो प्रकल्पाच्या ठेकेदार कंपनी असलेल्या अल्फा इन्फ्रा प्रोजेक्ट या कंपनीने शेकडो कामगारांच्या वेतनाची रक्कम दिलेली नाही. वेतन मिळावे म्हणून कामगाराचे गेल्या सहा दिवसापासून उपोषण सुरु आहे. परंतु, या कामगारांच्या मागणीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कामगारांच्या न्याय हक्कासाठी शुक्रवारी ( दि.7) सकाळी 11 वाजता महामेट्रो कार्यालय फुगेवाडी मोर्चा काढून टाळे ठोकणार आहे. तर सोमवारी (दि.10) कामगार आयुक्त कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

एचसीसी अल्फा इन्फ्राप्रोजेक्ट या मेट्रो स्टेशनची उभारणी करणा-या कंपनीमध्ये सुमारे १०० कामगार कर्मचारी काम करतात. महामेट्रो रेल प्रोजेक्टचे ठेकेदार अल्फा़  इन्फ्रा प्रोजेक्टच्या वल्लभनगर येथील कार्यालयासमोर आपल्या हक्काच्या पगारासाठी १ जूनपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. या कंपनीने १०० कामगारांना सहा महिन्यापासून पगार न देता केवळ एक-दोन महिन्याचा पगार देऊन या कामगारांना हाकलून देण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळी म्हणजे १ मे रोजी या कामगारांना उपोषण आंदोलन करायला लावले. ३ मे रोजी या कामगारांना ३५ लाख रु दिले, उर्वरीत  थकित ९० लाख रु. कामगारांची पगाराची रक्कम देण्यासाठी पुन्हा उपोषण सुरू झाले आहे.

सबंधीत ठेकेदार, मेट्रो, प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे सबंधीत ठेकदार, मेट्रोचे अधिकारी यांच्यावर आर्थिक फसवणूक, अफरातफर, विश्वासघात याबाबत पिपरी पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. तसेच दापोडी येथे पिंपरी सुरु असणा-या मेट्रो प्रकल्पाच्या स्थळी जाऊन तेथील कामगारांना या फसवणुकीबाबत जनजागृती पत्रके वाटप करुन जनजागृती करण्यात आली.

महामेट्रो व संबंधींत ठेकेदारांने हे आंदोलन गांर्भीयाने घेतले नसल्याने शुक्रवार दि. ७ जून सकाळी ११ वाजता महामेट्रो कार्यालय फुगेवाडी जकात नाका येथे मोर्चा आंदोलन होणार आहे. तर सोमवार दि. १० जून सकाळी ११ वाजता कामगार आयुक्त कार्यालय स्वारगेट या कार्यालयात कामगारांचे आंदोलन होणार आहे. तरी शहरातील संघटीत असंघटीत कामगार सामाजिक संस्थांनी यामध्ये सामील व्हावे, असे आवाहन मारुती भापकर, डॉ.सुरेश बेरी, सचिन देसाई, प्रभाकर माने, अभिजीत भास्करे, सुजित चव्हाण, केदार घाटपांडे, कृष्ण कुमार, आणि स्मृती शिंदे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button