breaking-newsराष्ट्रिय

जादूटोण्याच्या संशयातून ६ जणांना खाऊ घातली मानवी विष्ठा, दातही काढले

जोदूटोण्याच्या संशयातून ६ जणांचे दात काढल्याचा तसेच त्यांना जबरदस्तीने मानवी विष्ठा खायला घातल्याचा अघोरी प्रकार समोर आला आहे. ओडिशातील गंजम जिल्ह्यात ही घटना घडली आहे. याप्रकरणी २९ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून यांमध्ये २२ ज्येष्ठ महिलांचा समावेश आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील गोपापूर गावात ही अमानवी घटना घडली आहे. जादूटोण्याच्या संशयातून ६ पुरुषांना त्यांच्या घरातून जबरदस्तीने बाहेर काढत त्यांच्या जबड्यातून दात काढण्यात आले. तसेच त्यांना जबरदस्तीने मानवी विष्ठा देखील खायला घालण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी २२ महिलांसह २९ आरोपींना अटक केली आहे. यातील सर्व आरोपी हे ६० वर्षांवरील आहेत. या आरोपी महिलांच्या अशा कारवायांमुळे यापूर्वी ३ महिलांना आपला जीवही गमवावा लागला आहे.

गंजमचे पोलीस अधीक्षक म्हणाले, “या आरोपींवर यापूर्वीही तीन महिलांच्या मृत्यू आणि ७ महिलांना आजारी पाडण्यात जबाबदार असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात २९ लोकांना अटक करण्यात आली आहे. तसेच या भागात पोलिसांची गस्तही वाढवण्यात आली असून लवकरच उर्वरित आरोपींनाही अटक केली जाईल. या भागात कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना ऱोखण्यासाठी पोलीस पूर्णपणे सतर्क आहेत.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button