breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

अल्पवयीन मुलासमोर हस्तमैथून करणाऱ्या विकृताला अटक

चार वर्षाच्या मुलासमोर हस्तमैथून करणाऱ्या एका विकृताला मंगळवारी रात्री अटक करण्यात आली. हा विकृत पेशाने टेलर असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर मुलाने घाबरून आपल्या कुटुबीयांकडे तक्रार केली. त्यानंतर कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीवरून सदर टेलरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वांद्रे पोलीस स्थानकातील पोलिसांकडून देण्यात आली.

सदर अल्पवयीन मुलगा वांद्रे येथील त्या टेलरच्या दुकानाबाहेर खेळत असताना हा प्रकार घडला. त्यानंतर त्या मुलाने आपल्या घरी जाऊन याबाबत आपल्या काकांना माहिती दिली. सदर मुलगा हा एका व्यवसायिकाचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, समजावल्यानंतर सदर मुलाने घडलेल्या संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर त्याच्या आईने वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्वरित त्या टेलरला अटक केली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत त्या टेलरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या त्या टेलरची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button