breaking-newsमनोरंजन

‘कानपुरवाले खुरानास्’नं दिला कपिलला डच्चू?

कपिल शर्मा सुनील ग्रोव्हरसोबत छोट्या पडद्यावर पुनरागमन करत असल्याच्या चर्चा अगदी कालपरवापर्यंत सुरू होत्या. या दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक होते. मात्र सुनील ग्रोव्हरच्या एका पोस्टमुळे चाहत्यांचं या दोन्ही विनोदवीरांना एकत्र पाहण्याचं स्वप्न तूर्त तरी भंगलं आहे. कारण, कपिलच्या शोआधीच सुनील स्वत:चा कॉमेडी शो घेऊन छोट्या पडद्यावर परतत आहे. सुनीलनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट लिहित नव्या शोची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे कपिलच्या टीममधली उपासना सिंग आणि अली असगरही सुनीलच्या नव्या शोमध्ये सहभागी होणार आहेत.

‘कानपुरवाले खुरानास्’ असं सुनीलच्या नव्या कॉमेडी शोचं नाव असून यात कुणाल खेमूही दिसणार आहे. ‘गोलमाल’, ‘गोलमाल ३’, ‘ढोल’ यांसारख्या चित्रपटात काम केलेला कुणाल या कॉमेडी शोद्वारे छोट्यापडद्यावर पुनरागमन करत आहे. स्टार प्लस वाहिनीवर सुनील- कुणालचा कॉमेडीशो सुरू होत आहे. सुनीलनं बुधवारी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सेटवरचा फोटो पोस्ट करत नव्या शोची घोषणा केली आहे. सुनील छोट्या पडद्यावर परतणार ही आनंदाची बाब असली तरी तो कपिलसोबत दिसणार नाही यामुळे चाहते काहीसे नाराज झाले आहेत.

सुनील कपिलच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये काम करणार होता अशा चर्चा कालपरवापर्यंत होत्या. सलमान खान कपिलच्या नव्या शोची निर्मिती करणार आहे. या शोमध्ये सुनीलनं कपिलसोबत काम करावं यासाठी स्वत: सलमान प्रयत्न करत होता असंही म्हटलं जात होतं. मात्र आता सुनील स्वत:चा नवा शो आणतोय म्हटल्यावर या दोघांची एकत्र येण्याची शक्यताच कमी झाली आहे. डिसेंबर महिन्यात कपिल नवा शो घेऊन येत असल्याचं म्हटलं जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button