breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

‘काट्याने काटा काढणार’, अजित पवारांनी स्वीकारले भाजपचे आव्हान

मुंबई, महाईन्यूज

वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडून स्वगृही भाजपात परतलेले गोपीचंद पडळकरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात बारामतीतून मैदानात उतरवले आहे. हे आव्हान स्वीकारत काट्याने काटा काढणार, असे आव्हान देत बारामतीत आघाडीचा उमेदवार एक लाख मतांनी निवडून येणारच, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

भाजपा-शिवसेनेतील अनेक नाराज आमच्या संपर्कात आहेत, असे सांगताना त्यांनी सुरुवात केली, आता शेवट आम्ही करणार, अशा शब्दांत अजित पवार यांनी भाजपा-शिवसेनेला आव्हान दिले आहे. दरम्यान, दौलत दरोडा आणि भारत भालके यांनी सोमवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते.

पवार म्हणाले, मित्र पक्षातील राजू शेट्टी, कवाडे, अबू आझमी यांना आघाडीबरोबर घेण्याचा आमजा प्रयत्न आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात याबाबत चर्चा करणार आहेत. येत्या २ ऑक्टोबरला आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. तेव्हाच कोणाला कुठली उमेदवारी मिळेल हे स्पष्ट होईल. कारण, अनेकांनी पक्षांतर केल्याने सध्या महाराष्ट्रात गोंधळाचे वातावरण आहे. त्यामुळे कोणाला कुठून उमेदवारी मिळेल हे अत्ताच निश्चितपणे सांगता येणार नाही, असेही पवार यावेळी म्हणाले.

वरळीतील शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांच्याविरोधात आघाडीचा उमेदवार देणार, अशी घोषणाही अजित पवार यांनी केली. वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडून स्वगृही भाजपात परतलेले गोपीचंद पडळकरांचे बारामतीतील आव्हान त्यांनी स्विकारले. काट्यानं काटा काढणार असे म्हणत बारामतीत आघाडीची ताकद दाखवून देऊ, असे सांगताना बारामतीतील आघाडीचा उमेदवार १ लाख मतांनी निवडून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button