breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चाकण एमआयडीसीत भूमिपुत्रांवर अन्याय ; नोक-यासाठी उपोषणाचा इशारा

पिंपरी – चाकण औद्योगिक वसाहतीतील निघोजे हद्दीतील कंपन्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना कायमस्वरूपी नोकरी द्यावी; अन्यथा १ आॅक्टोबरपासून उपोषण करण्यात येईल, असा इशारा निघोजे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर तरुण व ग्रामस्थांनी दिला आहे.

चाकण औद्योगिक टप्पा क्रमांक १, ३ व ४ मध्ये औद्योगिकीकरण झाल्यानंतर नोकरी मिळेल, या आशेने अनेक शेतकºयांनी तुटपुंजा जमिनी दिल्या; परंतु त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. त्यांच्या मुलांना तर आलेल्या कंपन्यात नोकरी-व्यवसाय मिळत नसून लहानमोठे व्यवसाय करतानादेखील विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

निघोजे (ता. खेड)च्या स्थनिक भूमिपुत्र युवकांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध कंपन्यांकडे वेळोवेळी नोकरीची मागणी केली; परंतु त्यात अपयश आल्याने अखेर उपोषण करणार असल्याचे सरपंच रमेश गायकवाड यांनी सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button