breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जेएनयू विद्यार्थ्याच्या विरोधात देशद्रोहाचा खटला

नवी दिल्ली –

दिल्ली पोलिसांनी जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या (जेएनयू) आणखी एका विद्यार्थ्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल केला. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्लीतील शाहीन बागमध्ये गेल्या महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. प्रशोभक भाषण तसेच आसाम भारतापासून वेगळा करण्याच्या केलेल्या वक्तव्यानंतर शारजील इमामवर गुन्हा दाखल केला.अलीकडेच अस्तित्वात आलेल्या युएपीए कायद्यान्वये त्याच्या विरोधात खटला दाखल झाला. राष्ट्रविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी या कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सीएए कायद्याविरोधात शारजील चिथावणीखोर भाषणे देताना आढळून आला. तो जेएनयूचा विद्यार्थी असून बिहारमधील रहिवाशी आहे. अशा प्रकारच्या चिथावणीखोर भाषणांमुळे जातीय सलोख्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे देशाचे ऐक्य आणि एकात्मता कमकूवत होऊ शकते. शारजीलने किमान दोन वेळा भडकावू वक्तव्ये केल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला. शारजीलच्या भाषणाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान, शाहीन बागमध्ये विरोध करत असलेल्या आंदोलकांनी त्याच्या वक्तव्यापासून स्वतःला दूर ठेवणे पसंत केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button