breaking-newsक्रिडा

१० महिन्याच्या बाळाच्या आईने मोडला उसेन बोल्टचा विक्रम

अमेरिकेच्या एलिसन फेलिक्स हिने सोमवारी जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत उसेन बोल्टला मागे टाकत नवा इतिहास रचला. फेलिक्सने दोहा येथे सुरू असलेल्या स्पर्धेत ४ गुणिले ४०० मीटर मिश्र रिले प्रकारात आपल्या संघाला सुवर्णपदक जिंकवून दिले आणि स्टार धावपटू उसेन बोल्टचा विक्रम मोडीत काढला. महत्वाची बाब म्हणजे केवळ १० महिन्यांचे बाळ असलेल्या मातेने हा दमदार पराक्रम करून दाखवला आहे. १० महिन्यांपूर्वी फेलिक्सने एका गोंडस बाळाला जन्म दिला. सहा वेळा ऑलिम्पिक विजेत्या फेलिक्सने गेल्या वर्षी मुलाला जन्म दिला आणि त्यानंतर प्रथमच मैदानावर उतरली. त्यामुळे तिचा हा विक्रम अधिकच खास मानला जातो आहे.

फेलिक्सने ४ गुणिले ४०० मिश्र रिले स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले. त्याचसोबत तिचे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत हे १२ वे सुवर्णपदक ठरले. एखाद्या जागतिक स्पर्धेत एवढी सुवर्णपदके जिंकणारी फेलिक्स पहिलीचं धावपटू खेळाडू ठरली. यापूर्वी हा विक्रम उसेन बोल्ट याच्या नावावर होता. त्याच्या नावावर आतापर्यंत ११ सुवर्णपदके आहेत. तो २०१७ मध्ये अखेरचा स्पर्धेत उतरला होता. पण त्याचा हा विक्रम फेलिक्सने मोडला.

अमेरिकेच्या मिश्र रिले संघाने तीन मिनिटे आणि नऊ पूर्णांक ३४ सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली आणि विश्वविक्रमाची नोंद करताना सुवर्णपदक जिंकले. ३३ वर्षीय फेलिक्सने जागतिक स्पर्धेत पाचव्यांदा सहभाग घेतला होता. तिने २०० मीटर, ४०० मीटर, ४ गुणिले १०० मीटर, ४ गुणिले ४०० मीटर आणि ४ गुणिले ४०० मीटर मिश्र रिले अशा विविध स्पर्धांमध्ये एकूण १२ सुवर्णपदके जिंकली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button