breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कांद्यानंतर आता लसूण झाला महाग…

काही महिन्यांपासून सातत्याने वाढत असलेले कांद्याचे भाव कमी झाले मात्र लसूण आता महाग झालेत…पांढरा लसूण 200 ते 215 रुपये तर गावरान लसूण ४०० रुपय किलो दराने विक्री होत आहे.

जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात दररोज स्थानिकसह शेजारील जिल्ह्यास परपेठहून शेतीनियमित मालाची आवक होते. मध्यतंरी पालेभाज्याची आवक मोठ्या प्रमाणात होती, परंतु गुरुवारी ती काही प्रमाणात मंदावल्याचे चित्र होते. गुरुवारी कोथिंबिरच्या १७ हजार २०० जुड्यांची आवक बाजारात झाली. त्यास १५० रुपये किमान तर कमाल दर हा २५० रुपये प्रती शेकडा मिळाला. तर मेथीच्या १४ हजार जुड्या ठोक बाजारात दाखल झाल्या असून ४०० रुपये प्रती शेकडा असा सरासरी दर शेतकऱ्यांना मिळाला. दरम्यान, किरकोळ बाजारात पाच रुपये प्रती जुडी या दरात पालेभाज्यांची विक्री होत आहे.

कांद्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून कमी होत आहेत. बाजारात २० रुपये किलोपासून कांदे उपलब्ध असतील तरी चांगल्या प्रतीच्या कांद्याची विक्री ४० रुपये किलो दराने होत आहे, अशी माहिती टीव्ही सेंटर येथील विक्रेते नरहरी येवलेकर यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button