breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

सोसायटीधारकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार महेश लांडगे यांचा ‘परिसंवाद’

  • महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा सकारात्मक सहभाग
  • चिखली-मोशी हौसिंग सोसायटी फेडरेशनचा विधायक पुढाकार

पिंपरी । प्रतिनिधी ।

भोसरी विधानसभा मतदार संघातील गृहनिर्माण सोसायट्यांमधील विविध समस्या तसेच महापालिका प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या विविध योजना याची माहिती सोसायटीधारकांना व्‍हावी यासाठी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला चिखली, मोशी परिसरातील सोसायटीधारकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

भोसरीचे आमदार महेश लांडगे तसेच चिखली-मोशी हौंसिग सोसायटी फेडरशेनतर्फे रविवारी सकाळी सिटी प्राईड स्कूल, रिव्हर रेसीडन्सी रोडसमोर, देहू-मोशी रोड, जाधववाडी चिखली येथे ‘गृहनिर्माण सोसायट्यांमधील समस्या व उपाय.’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. चिखली, मोशी, च-होली परिसरातील गृहनिर्माण सोसाट्यांमधील समस्या, प्रलंबित प्रश्न, त्या मार्गी लावण्याबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर यांच्यासह महापालिका सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी, स्थानिक नगरसेवक उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून चिखली-मोशी या परिसरात उभ्या राहिलेल्या उच्चभ्रू गृहनिर्माण सोसाट्यांकडे झालेले दुर्लक्ष, या दुर्लक्षावर उपाययोजना करण्यासाठी महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी मार्गदर्शन केले. पाणी पुरवठा, बांधकाम व्यावसायिकांकडून होणारा त्रास, वाहतूक समस्या, अतिक्रमण, विकसकांकडून होणारा त्रास व फसवणूक, प्रस्तावित अद्यावत रस्त्यांच्या विकासाबाबत, वाढते प्रदूषण व अनधिकृत भंगार व्यावसाय, प्रस्तावित विकसित आराखडा, भविष्यातील पाण्याचे नियोजन, ओला व सुका कच-याचे नियोजन, व्यवस्थापन, नियोजित सांडपाणी प्रकल्प, महिला सुरक्षा आणि वाढती गुन्हेगारी आदी विविध समस्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

****

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात….

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button