breaking-newsराष्ट्रिय

मोदी सरकारची ऑफर ; बेहिशेबी मालमत्तेची माहिती द्या, १ कोटींचे बक्षीस मिळवा

नवी दिल्ली : बेहिशेबी मालमत्ताधारकांना झटका देण्यासाठी मोदी सरकारने एक नवी शक्कल लढवली आहे. बेहिशेबी मालमत्तेसंदर्भात जो कोणी माहिती देईल, त्याला मोदी सरकारकडून बक्षिसाच्या स्वरूपात 1 कोटी दिले जाणार आहेत. प्राप्तिकर विभागाने बेहिशेबी मालमत्तेचा थांगपत्ता लावण्यासाठी ‘बेनामी ट्रान्सफर सूचना रिवॉर्ड योजना 2018’ला सुरुवात केली आहे.

या योजनेंतर्गतही बेहिशेबी मालमत्तेची माहिती देणा-याला 1 कोटींचे बक्षीस मिळणार आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. बेनामी ट्रान्सफर सूचना रिवॉर्ड योजना 2018’अंतर्गत जॉइंट किंवा अॅडिशनल कमिश्नर प्राप्तिकर विभागाचे संचालक यांच्या अखत्यारीत येणा-या बेनामी मालमत्तेसंदर्भात माहिती देणा-यास 1 कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार आहे.

विशेष म्हणजे माहिती देणा-याचं नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. परंतु जर माहिती देणा-यानं चुकीची माहिती दिल्यास त्याला कोणतीही रक्कम मिळणार नाही. त्यासाठी प्राप्तिकर विभाग चौकशी करणार आहे. बेनामी मालमत्ता नियंत्रण कायदा, 1988अंतर्गत येणारी बेनामी मालमत्तेची माहिती देणा-यास हे बक्षीस मिळणार आहे. बेनामी मालमत्ता नियंत्रण कायदा, 1988या कायद्यात 2016मध्ये बदल करून तो आणखी कडक करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button