breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काल झालेल्या बैठकीनंतर संजय राऊतांनी साधला भाजपावर निशाणा

मुंबई- राज्यात शिवसेना-भाजपाचा वाद विकोपाला गेलेला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसुद्धा शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन करण्यास तारीख पै तारीख देत असल्यानं भाजपाही त्याचा फायदा उचलत शिवसेनेला डिवचण्याची एकही संधी सोडत नाही. महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवून शिवसेनेसह सरकार स्थापन करण्यावर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बुधवारी चर्चेनंतर एकमत झाल्याची चर्चा आहे. शरद पवार यांच्याकडे साडेतीन तास झालेल्या चर्चेमध्ये दोन्ही पक्षांत ठरलेला किमान समान कार्यक्रम शिवसेनेने स्वीकारण्यावर व सत्तावाटपावर चर्चा झाली. त्यानंतर आता शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊतांनी ट्विट करत पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे.

हम बुरे ही ठीक है, जब अच्छे थे तब कौनसा मेडल मिल गया था..!!, अशा ट्विटमधून त्यांनी भाजपाला उपरोधिक टोला लगावला आहे. तत्पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेने नेते खा. संजय राऊत यांनी आता पेढ्यांची ऑर्डर द्यायला हरकत नाही, असे सांगून गोड बातमी लवकरच येईल, असे स्पष्ट केले.

Sanjay Raut✔@rautsanjay61

View image on Twitter

नंतर ते शरद पवार यांना भेटायला गेले. पण त्यापूर्वी त्यांनी ‘उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे, अशी महाराष्ट्राची इच्छा आहे’, असे सांगतानाच, ‘शिवतीर्थावर शपथविधी होईल, तेव्हा तुम्हाला नाव कळेलच’, असेही नमूद केले होते. त्यामुळे महाराष्ट्रात लवकरच महाशिवआघाडीचं सरकार सत्तेवर येण्याची चिन्हे आहेत. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button