breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

मावळवर पुन्हा भगवा फडकवणार : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंनी संजोग वाघेरेची उमेदवारी केली जाहीर

पनवेल : मावळ लोकसभेवर पुन्हा भगवा फडकाविण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मावळ लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर असताना पनवेल येथील सभेत संजोग वाघेरे यांना उमेदवारी जाहीर केली. शिवसेना पक्ष आणि पक्ष चिन्ह शिंदे गटाला गेल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असणार आहे. यावेळी ठाकरे यांनी मावळ मतदार संघावर पुन्हा भगवा फडकवण्याची घोषणा केली.

सोमवार दिनांक 4 मार्च रोजी उद्धव ठाकरे यांची मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल, खोपोली, उरण या तीन ठिकाणी सभा घेतल्या. सुरुवातीला हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजचे उद्घाटन केल्यानंतर पनवेल येथे सभा घेण्यात आली. यावेळी पिंपरी चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे यांची उमेदवारी घोषित करून मावळ मतदार संघावर पुन्हा भगवा फडकवणार असे म्हटले आहे.

मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. मावळ लोकसभा स्थापनेपासून शिवसेनेचा सलग 15 वर्ष खासदार निवडून येत आहे. आता शिवसेनेचे दोन भागात विभागणी झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने मावळ लोकसभेवर पुन्हा भगवा फडकवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून आलेले माजी महापौर संजोग वाघेरे त्यांना शिवसेना ठाकरे गटाकडून या लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर करत कामाला लागण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज तमाम शिवसैनिकांना दिले आहेत.

मावळ लोकसभेतील मतदार सुरुवातीपासूनच ठाकरे घराण्याची विचाराशी ठाम राहिले आहेत. या मतदारसंघात शिवसेनेचे मोठे वलय आहे. राज्यात राजकीय सत्ता नाट्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सोबतीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार, राष्ट्रीय काँग्रेस, शेकाप अशा विविध पक्षांचा पाठिंबा मिळणार आहे. २००९ साली घाटाखालील तीन पनवेल, कर्जत- खालापूर व उरण तीन विधानसभा आणि घटावरती पिंपरी, चिंचवड व मावळ तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. २००९ साली मावळ लोकसभा मतदारसंघ निर्माण झाला तेव्हापासून शिवसेनेचा भगव्याने हॅट्रिक केली आहे. आता महायुती विरोधात महायुतीकडून संजोग वाघेरे यांच्या रूपात तगडे आव्हान उभे करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मावळ वरती पुन्हा भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button