ताज्या घडामोडीराष्ट्रिय

काँग्रेसच्या संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल, महाराष्ट्राचे प्रभारीही बदलले

नवी दिल्ली – काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा पेच कायम असतानाच आता संघटनात्मक पातळीवर मोठे बदल करण्यात आले आहे. या बदलांमध्ये गुलाम नबी आझाद, मोतीलाल व्होरा, अंबिका सोनी, मल्लिकार्जुन खरगे यांना महासचिव पदावरून हटवण्यात आले असून त्यांच्याऐवजी नव्या नेत्यांकडे राज्यांचा प्रभार देण्यात आला आहे.

लक्षद्वीप, रणदीप सुरजेवाला यांच्याकडे कर्नाटक राज्याचा प्रभार देण्यात आला आहे. तर, तारीक अन्वर यांच्याकडे केरळचा भार देण्यात आलाय. मुकुल वासनिक यांच्याकडे मध्य प्रदेशचा प्रभार कायम ठेवण्यात आला आहे तर तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीचा प्रभार काढून घेण्यात आला आहे. अर्थात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दैनंदिन कामकाजात मदत करण्यासाठी जी सल्लामसलत कमिटी बनवण्यात आली आहे, त्यात सहा जणांच्या कमिटीत मुकुल वासनिक यांना स्थान आहे. या सहा जणांच्या कमिटीत ए के अँटोनी, अहमद पटेल, अंबिका सोनी, केसी वेणुगोपाल, मुकुल वासनिक आणि रणदीप सुरजेवाला यांचा समावेश असेल.

दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी बदलले आहेत. मल्लिकार्जुन खरगे यांच्या ऐवजी कर्नाटकच्या एचके पाटील आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी असतील. खरगे यांची महाराष्ट्रातून उचलबांगडी झाली आहे. पण पुन्हा एकदा कर्नाटकच्या व्यक्तीकडे महाराष्ट्र काँग्रेसचा प्रभार कायम राहणार आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना संघटनात्मक पातळीवर कुठली मोठी जबाबदारी मिळते का याची उत्सुकता होती. मात्र, नव्या बदलांमध्ये त्यांचं नाव कुठेही दिसत नाही. राजीव सातव यांच्याकडे महत्त्वाच्या गुजरात राज्याचा प्रभार कायम ठेवण्यात आला आहे. रजनी पाटील यांच्याकडे हिमाचल ऐवजी आता जम्मू-काश्मीरची जबाबदारी असेल.

सोनिया गांधी यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीची देखील पुनर्रचना केली आहे. या कमिटीत शशी थरूर, मनीष तिवारी यांना स्थान मिळू शकले नाही. महाराष्ट्रातून वर्किंग कमिटीत राजीव सातव, मुकुल वासनिक, रजनी पाटील, अविनाश पांडे यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातले हे सगळे याआधीही वर्किंग कमिटीचे सदस्य होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button