breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

धक्कादायक! नागपूर मध्ये घरात घुसून 5 ते 6 जणांचा पती-पत्नीवर बेछुट गोळीबार

नागपूर:  देशाची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात गुन्हेगारांना कायद्याचा काही धाक राहिला की नाही असा सवाल आता उपस्थितीत झालेला आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वरमध्ये भरदिवसा घरात घुसून 5 ते 6 जणांनी दाम्पत्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या जखमी दाम्पत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. गणेश मेश्राम  (वय 32) आणि प्रियांका मेश्राम (वय 28) अशी गोळीबार झालेल्या दाम्पत्याची नावं आहे. कळमेश्वर येथील लोहकरे लेआऊटमध्ये  शिवाजी गाऊंडजवळ मेश्राम दाम्पत्य वास्तव्यास आहे. आज सकाळी गणेश मेश्राम आणि प्रियका गणेश मेश्राम  यांच्या घरात 5 ते 6 अज्ञात इसम घुसले होते. काही कळायच्या आत त्यांनी दोघांवर बेछुट गोळीबार केला आहे.

यामध्ये गणेश यांच्या पोटाला गोळी लागली तर  प्रियांकाच्या पोटाला गोळी लागून गेली. रक्ताच्या थारोळ्यात हे दाम्पत्य कोसळल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन फरार झाले. त्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेऊन जखमी अवस्थेत दोघांनाही रूग्णालयात नेण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार मारुती मुळूक पोलीस कर्मचाऱ्यांसह पोहोचले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button