breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये एक हजार 865 रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह

पिंपरी महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड शहरात एक हजार 865 आणि महापालिका हद्दीबाहेरील 16 असे एकूण एक हजार 881 एवढे नवीन कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आज (बुधवारी) आढळून आले आहेत. विशेषता महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 386 आणि ‘ड’ कार्यालय हद्दीत 311 नवीन रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, कोणतीही लक्षणे नसलेल्या 824 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला तर शहरातील 10, महापालिका हद्दीबाहेरील 5 अशा 15 जणांचा मृत्यू झाला.

त्यात मोशीतील 22 वर्षाचा तरुण, पिंपळेसौदागर येथील 58 वर्षीय पुरुष, पिंपळेगुरव येथील 75 वर्षीय पुरुष, भोसरीतील 86, 75 वर्षीय दोन पुरुष, सांगवीतील 42 वर्षीय पुरुष, पिंपरीतील 62 वर्षीय पुरुष, पिंपरीतील 67 वर्षीय महिला, चिंचवड येथील 58, 60 वर्षीय दोन महिला, चाकण येथील 65 वर्षीय पुरुष, पाबळ येथील 65 वर्षीय पुरुष, आळंदीतील 65 वर्षीय पुरुष, मावळातील 73 वर्षीय पुरुष आणि राजगुरुनगर येथील 70 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत मागील चोवीस तासात दहा मृत्यू झाले आहे. आधी मृत झालेल्या पाच केसेस आज कळविल्यामुळे मृत्यूचा आकडा वाढलेला दिसत आहे. शहरात आजपर्यंत 1 लाख 26 हजार 936 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 12 हजार 40 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1 हजार 943 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 815 अशा 2 हजार 758 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महापालिकेच्या रुग्णालयात सध्यस्थितीत 2 हजार 054 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, 1 हजार 366 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 1 लाख 7 हजार 27 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. आज दिवसभरात 4 हजार 685 लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घेतले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button