breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सत्ताधारी भाजपकडून अफवांचे पीक; लोकप्रतिनिधींना धमकावून पक्षांतराचा घाट : शरद पवार

मुंबई । प्रतिनिधी ।
महाराष्ट्रात सध्या एकच चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांविषयी काही वास्तव काही अवास्तव बातम्या येत आहेत. राज्याचे प्रमुख आणि काही नेत्यांनी सध्या याच कामासाठी वाहून घेतले आहे. अनेकांना फोन करतायत. काही सरकारी एजन्सीचा वापर करून सध्या हे सगळं सुरू आहे. लोकप्रतिनिधींना धमकावून पक्षांतर केले जात आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
शरद पवार म्हणाले की, राज्य सरकारकडे असलेल्या संस्थांचा वापर करून लोकप्रतिनिधींना काही अटी घालून देण्यात येत आहेत. पंढरपूर मधील कल्याण काळे यांचा साखर कारखाना अडचणीत होता. राज्य सरकारने नियम सोडून ३०-३५ कोटी दिले. पण त्यांना अट घातली पक्षांतर करा. त्यांना संस्था टिकवायची होती. त्यांनी पक्षांतर केलं.
पुणे जिल्ह्यातील भिमा पाटस साखर कारखान्याकडे पुणे जिल्हा बँकेचे कर्ज आहे. त्यांचे खाते एनपीएमध्ये आहे. त्यांना सरकारने आर्थिक मदत केली आणि लोकसभेची निवडणूक लढवण्यास भाग पाडले. त्यांची इच्छा असो अथवा नसो त्यांच्या कुटुंबियांना लोकसभा निवडणूक लढवावी लागली.
कर्नाटकातील मंत्र्यांना मुंबईत जी वागणूक दिली ती पाहता राज्यात कायदा आहे का नाही असा प्रश्न पडला. चित्रा वाघ यांचे उदाहरण. त्यांच्या पतीवर एसीबीची केस आहे. तसेच त्यांच्या सहकारी संस्थांची देखील एसीबी चौकशी लावण्यात आली आहे. त्यामुळे मला बाहेर जाण्यास परवानगी द्या, असे चित्रा वाघ यांनी सांगितलं, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.
***
…तरीही छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल केला : पवार
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या बाबतीतही तेच करण्यात आले आहे. आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील महाराष्ट्र सदनात बैठका घेतात. त्यासाठी राज्य सरकारचा एकही रुपया गेलेला नाही. महाराष्ट्र सदनाचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. तरीही भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. कर्नाटक नंतर राजस्थान आणि मध्य प्रदेश ही सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जातोय, जे संसदीय लोकशाहीसाठी घातक आहे. कालच माझ्याकडे शिवेंद्रसिंहराजे भोसले दीड तास बसले होते, मी पक्षाच्या चौकटीच्या बाहेर जाणार नाही असं म्हणाले. आमदार संग्राम जगताप आणि राहुल जगताप यांचा आजच सकाळी फोन आला होता, दोघांनी पक्ष सोडणार नसल्याचं सांगितले आहे. आमच्या विषयी अफवा पसरवल्या जात आहेत, असंही शरद पवार यांनी म्हटले आहे.

https://www.facebook.com/PawarSpeaks/videos/425874241337086/

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button