breaking-newsमुंबई

कल्याण-डोंबिवलीत आजपासून विशेष धुरावणी फवारणी मोहीम..

कल्याण : कोरोना व पावसाळयातील साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेकडून कल्याण आणि डोंबिवली शहरात धुरावणी आणि फवारणीची विशेष मोहीम आजपासून राबवण्यास सुरुवात करण्यात आली. आज सकाळी सात वाजता शिवाजी चौक परिसरात पालिका अधिकारी कर्मचाऱ्यांसह चार जीप माउंटेड मशीन, 11 ट्रॅक्टर व अग्निशमन दलाच्या सात गाड्यांच्या सहाय्याने एकाच वेळी रस्त्यावर धुरवणी व सोडियम हायडोक्लोराईडची फवारणी करण्यात आली.

एकाच दिवसात कल्याण पश्चिम व डोंबिवली पूर्व परिसरात धुरवणी व फवारणी पूर्ण करण्यात येणार आहे. तर पुढील आठवड्यात कल्याण पूर्व व डोंबिवली पश्चिम भागात करण्यात येणार असून, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि पावसाळ्याचे साथीचे रोग या पार्श्वभूमीवर धूर फवारणी आणि औषध फवारणीची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या फवारणीत सात आगीचे बंब वापरत या बंबांच्या माध्यमातून सोडियम हायडोक्लोराईडची फवारणी सर्व ठिकाणी केली जात आहे. त्याच प्रमाणे कीटकनाशक फवारणी ही ट्रॅक्टरच्या मदतीने केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button