breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

‘वातावरण फिरलयं, सरकार घाबरलयं’ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची फलकबाजी

मुंबई | महाईन्यूज |प्रतिनिधी |

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील कार्यालयाला भेट देणार होते. यावेळी ‘वातावरण फिरलयं, सरकार घाबरलयं’, कोण आला रे कोण आला, मोदी-शहाचा बाप आला, असे फलक घेवून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देवून परिसर दणाणून सोडला होता.

राष्ट्रवादीच्या अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळपासूनच पवारांच्या मुंबईमधील ‘सिल्वर ओक’ येथील निवासस्थानी गर्दी केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेरही कार्यकर्त्यांनी पवारांच्या समर्थनार्थ मोठी गर्दी केली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे, डोक्यावर ‘मी साहेबांसोबत’ असा मजकूर असणाऱ्या गांधी टोप्या घातल्या होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ‘अब की बार शरद पवार’, ‘एकच साहेब पवार साहेब’, ‘ईडी झाली येडी’ ‘कोण आला रे कोण आला मोदी शहाचा बाप आला’ अशी घोषणाबाजी यावेळी कार्यकर्त्यांनी करत शरद पवारांनी पाठिंबा दर्शवला. तर अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या समर्थनार्थ वेगवेगळे पोस्टर्स आणि बॅनर्सही आणले होते. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button