breaking-news

कलह पसरविणाऱ्यांना समाजच सरळ करेल- सरसंघचालक डॉ.मोहन भागवत

नागपूर | महाईन्यूज

आपल्या देशातील काही तत्त्वांमुळे अस्वस्थ वाटत असल्याचे लोक म्हणतात. परंतु त्याला घाबरण्याची आवश्यकता नाही. विद्येमुळे समाजात सकारात्मक वाढते. जर विद्येचा योग्य उपयोग झाला कलह पसरविणाºया तत्त्वांना जग व समाज ओळखेल आणि त्यांना दूर करेल. त्यांच्यातील कटुता व वाकडेपणा समाजाला बदलू शकत नाही. परंतु समाज एकत्रित येऊन अशा तत्त्वांना सरळ करु शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले आहे.

श्री नागपूर गुजराती मंडळद्वारा संचालित सायन्स कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या समारोपीय सोहळ्याप्रसंगी ते गुरुवारी बोलत होते. ब्रिटिशांच्या काळापासून देशाने अनुभव घेतला आहे की राजकारणाच्या माध्यमातून लोकांना कायम चिथावणी दिली जाते. प्रत्यक्षात वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची स्वत:ची काहीच शक्ती नसते. परंतु समाजात कर्तृत्व, सक्रियता व सकारात्मकतेच्या प्रकाशाचा अभाव असतो व त्यामुळे लोकांना देशात अंधकारमय वातावरण असल्याचे वाटते आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button