breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2020: दिल्ली ठरली वरचढ, राजस्थानचा धुव्वा

दुबई – आयपीएलच्या तेरावा हंगामाच्या आजच्या शर्यतीत दिल्ली कॅपिटल्स संघाने २० षटकांत १८०पार मजल मारली. राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेऊनही त्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली. शिमरॉन हेटमायर आणि मार्कस स्टॉयनीस या दोन परदेशी खेळाडूंनि तडाखेबंद खेळीच्या बळावर दिल्लीने ८ बाद १८४ धावा कुटल्या आणि राजस्थानला मोठं आव्हान दिलं.

दिल्लीच्या संघाने मोठी धावसंख्या उभारण्याच्या दृष्टीने पहिल्या षटकापासून फटकेबाजी सुरू केली होती, पण त्यात त्यांचेच फलंदाज अडकले. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ हे दोघेही सलामीवीर स्वस्तात माघारी परतले. आर्चरने धवनला ५ धावांवर तर पृथ्वी शॉला १९ धावांवर माघारी धाडले. सलामीवीर बाद झाल्यावर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर या दोघांमध्ये चांगली भागीदारी होईल अशी अपेक्षा होती पण तेवढ्यात दिल्लीच्या डावात माशी शिंकली. अय्यर १७ चेंडूत २२ धावा काढून बाद झाला. अय्यर बाद झाल्यानंतर ऋषभ पंतदेखील लगेचच धावबाद झाला. त्याने ५ धावा केल्या. त्यानंतर मार्कस स्टॉयनीसने धमाकेदार खेळी केली. त्याने ४ षटकारांसह ३० चेंडूत ३९ धावा कुटल्या. तर शिमरॉन हेटमायरनेही तुफान फलंदाजी केली. ५ षटकारांसह २४ चेंडूत त्याने ४५ धावा केल्या. त्यानंतर अक्षर पटेलने ८ चेंडूत १७ धावांची खेळी करत संघाला १८०पार मजल मारून दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button