breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पिंपरी-चिंचवडच्या महापौर पदासाठी उद्या मंत्रालयात सोडत

कोण होणार पिंपरी-चिंचवडचा नवीन महापौर ?

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

राज्यातील 27 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षण निश्चितीची सोडत उद्या बुधवारी (दि. 13) मुंबईत काढली जाणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत महापौर पदासाठी कोणत्या प्रवर्गाचे आरक्षण निश्चित होणार हे उद्या कळणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेसह राज्यातील 27 महापालिकांच्या महापौर पदाचा कार्यकाल संपुष्टात येत आहे. त्यामुळे आगामी काळात महापौर हे पद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षीत राहणार यासाठी ही सोडत काढली जाणार आहे. उद्या मुंबईत मंत्रालयात सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात प्रधान सचिव (नवि-2) यांच्या अध्यक्षतेखाली सोडत काढली जाणार आहे.

सोडत काढत असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर राहूल जाधव, स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी, सभागृहनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी उपस्थित राहण्याचे निमंत्रण अवर सचिव सचिन सहस्त्रबुध्दे यांनी महापालिकेला दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button