breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत २४ तासांत कोरोनाचे २ हजार ३६० नवीन रुग्ण

मुंबई – मुंबईत बुधवारी कोरोनाच्या 2360 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा 1 लाख 90 हजार 138 झाला आहे. बुधवारी दिवसभरात 52 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी 40 जणांना दीर्घकालीन आजार होते. बुधवारी ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे 1,936 नव्या रुग्णांचे निदान झाले असून 29 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत 4,234 मृत्यू झाले असून कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 1 लाख 63,595 वर पोहोचला आहे. ही संख्या राज्यातील तिसर्‍या क्रमांकाची आहे. राज्यात बुधवारी कोरोनाचे 19 हजार 476 रुग्ण बरे झाले तर, 21 हजार 29 नवे रुग्ण दाखल झाले. आतापर्यंत राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 9 लाख 56 हजार 30 वर पोहोचली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.65 टक्के एवढे झाले असून सध्या 2 लाख 73 हजार 477 अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button