ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

शासकीय योजनांची माहिती देत विकसित भारत संकल्प यात्रा उत्साहात

शासनाच्या विविध योजना नागरिकांना दिली माहिती, जास्तीत जास्त योजनांचा प्रत्यक्ष लाभ घ्यावा, मा.नगरसेवक शांताराम बाप्पू भालेकर यांचे आवाहन

पिंपरीः प्रबोधनकार ठाकरे शाळा व तळवडेगाव येथील कै. किसनराव अंतुजी भालेकर प्राथमिक शाळा क्रमांक ९८ मध्ये विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत शासनाच्या विविध योजनांची नागरिकांना माहिती देण्यात आली. योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेण्यात यावा अशा प्रकारचे आवाहन मा.नगरसेवक शांताराम बाप्पू भालेकर यांनी केले. यामध्ये पी.एम. स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना, आधारकार्ड अपडेट करणे, आरोग्य तपासणी व इतर योजनचे शाळेमध्ये स्टॉल लावले होते.

Government, plans, information, developed India, Sankalp Yatra, enthusiastically,
Government, plans, information, developed India, Sankalp Yatra, enthusiastically,

सकाळी ९ ते सांय. ५.३० वाजेपर्यंत बहुसंख्य नागरिक या योजनांचा फायदा घेत आहेत. तसेच सकाळी १०.३० वाजता विकसित भारत संकल्प रथाचे उद्घाटन माजी नगरसेवक शांताराम बाप्पू भालेकर, माजी नगरसेवक प्रवीण भालेकर, रमेशशेठ भालेकर, फ प्रभागाचे क्षेत्रीय अधिकारी सिताराम भवरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी शांताराम माने, सामाजिक कार्यकर्त्या वैशालीताई भालेकर, मुख्य आरोग्य निरीक्षक इंदलकर, किसन मिसाळ, आरोग्य निरीक्षक महेंद्र साबळे, अंजली गायकवाड, कोमल मोरे, शिंदे काका, भोसले काका व जनवाणीचे सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी विकसित भारत संकल्प योजनांची शपथ घेण्यात आली.

माजी नगरसेवक शांताराम बापू भालेकर यांनी विकसित संकल्प यात्रे अंतर्गत शासनाच्या विविध योजनाची माहिती नागरिकांना देऊन या सर्व योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, अशा प्रकारचे आव्हान प्रभाग क्रमांक १२ मधील नागरिकांना करण्यात आले. या संकल्प रथाद्वारे भारत सरकारच्या विविध विकासकामाचे व राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. या कार्यक्रमानिमित्त जनवाणी स्टाफ, जेष्ठ नागरिक, महिला व महानगरपालिकेचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button