breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कर्नाळा बँक घोटाळ्याची ईडी चौकशी, शेकापचे माजी आमदार विवेक पाटलांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं

पनवेल | रायगड जिल्ह्यातील ‘कर्नाळा नागरी सहकारी बँक‘ घोटाळा प्रकरणी आता अंमलबजावणी संचालनालय चौकशी करणार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार आणि कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हं आहेत.

कर्नाळा बँकेत 650 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा उघडकीस आल्यानंतर बँकेच्या व्यवहारांवर मर्यादा आली होती. ठेवीदार आणि खातेधारकांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळावे यासाठी पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी खातेदार आणि ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला होता. बँकेच्या विरोधात ठेवीदारांसोबत आंदोलनही केले होते.

यासंदर्भात आता आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांना ईडी कार्यालयात बोलवलं होतं. दोन्ही आमदारांनी आपले म्हणणे ईडी कार्यालयात जाऊन मांडले असून घोटाळ्यासंदर्भातील पुरावे सादर केले असल्याची माहिती पुढे येत आहे. ईडीच्या चौकशीमुळे बँक आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार विवेकानंद पाटील यांच्यावर आता टांगती तलवार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button