breaking-newsआंतरराष्टीय

भारताचं घातक अस्त्र ‘नाग’, दिवसाच नाही आता अंधारातही उडवणार शत्रूचा रणगाडा

नाग या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राचा लवकरच लष्कराच्या ताफ्यात समावेश होईल. रविवारी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) पोखरण फायरींग रेंजवर नाग क्षेपणास्त्राच्या तीन यशस्वी चाचण्या घेतल्या. रविवारी दिवसा आणि रात्री दोन्ही वेळा नाग क्षेपणास्त्र डागून चाचणी घेण्यात आली. तिन्ही चाचण्या यशस्वी ठरल्याचे डीआरडीओच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

नाग क्षेपणास्त्र लष्कराच्या ताफ्यात समावेश होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. डीआरडीओने विकसित केलेल्या नाग क्षेपणास्त्रांची ५२४ कोटी रुपयांना खरेदी करण्याच्या प्रस्तावाला डीएसीने मागच्यावर्षीच मंजुरी दिली आहे. नाग ही तिसऱ्या पिढीची रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र यंत्रणा आहे. क्षेपणास्त्र वाहून नेणारे वाहनही या सिस्टिममध्ये आहे.

दिवसाच नव्हे तर रात्रीच्या वेळी सुद्धा शत्रू देशाचे रणगाडे उद्धवस्त करण्याची नागमध्ये क्षमता आहे. नागच्या समावेशाने भारतीय लष्कराची हल्ला करण्याची क्षमता वाढणार आहे. १९८० च्या दशकात भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाच क्षेपणास्त्र विकसित करण्याची योजना बनवण्यात आली होती. नाग त्यापैकी एक आहे. अग्नि, पृथ्वी आणि आकाश ही क्षेपणास्त्र सुद्धा याच कार्यक्रमातंर्गत विकसित करण्यात आली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button