breaking-newsपिंपरी / चिंचवड

अग्निशमनच्या तत्परतेने वाचले झोपलेल्या कामगारांचे प्राण, अचानक शॉर्टसर्किटमुळे लागली होती आग

पिंपरी-चिंचवडमध्ये महावितरणच्या गलथान कारभारामुळे चार कामगारांचा जीव धोक्यात आला होता. शॉर्टसर्किट होत असल्याची वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. अखेर शनिवारी(दि.6) रात्री उशिरा कामगार झोपलेल्या आर्ट ग्लास कंपनीत शॉर्टसर्किट होऊन मीटरमध्ये आग लागली. बाहेरून शटर बंद असल्याने कामगारांना बाहेर पडता येत नव्हते. वेळीच फोनद्वारे अग्निशमन दलाला याची माहिती दिल्याने मोठा अनर्थ टळला. इरफान शेख (वय-४५), अखिल मुजावर (वय-४५), आसिफ (वय-३५), शान बाज (वय-३५) अशी कंपनीत झोपलेल्या कामगारांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मोरवाडी येथे रात्री सव्वा अकरा वाजता मोहम्मदिया आर्ट ग्लास येथे शॉर्टसर्किट होऊन मीटरमध्ये आग लागली होती. कंपनीमध्ये चार कामगार झोपले होते. मीटरमधून धूर निघत असल्याचे एकाने पाहिले. परंतु, बाहेरून शटर बंद आणि मोठा पाऊस सुरू असल्याने त्यांना बाहेर पडता येत नव्हते. परिसरात करंट देखील उतरला होता. म्हणून कोणी शटरकडे गेले नाही. आत झोपलेल्या कामगार इरफान शेख याने फोनद्वारे अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशामक अधिकारी अशोक कानडे, हनुमंत होले, निखिल गोगवले, अमोल चिपळूणकर, संभाजी दराडे, वाहन चालक विशाल बाणेकर हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अगोदर महावितरणला फोन करून वीजप्रवाह बंद करण्यास सांगितला आणि आतील घाबरलेल्या कामगारांना आवाज देऊन शटर उघडण्यास सांगितले. तेव्हा, शटरमध्ये करंट उतरल्याचे कामगारांनी सांगितले. मात्र अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना धीर देत वीजप्रवाह खंडित केल्याचे सांगितले आणि कामगारांनी सुटकेचा निःश्वास सोडला आणि त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button