breaking-newsराष्ट्रिय

कर्नाटकात बाजी मारणारेच आगामी लोकसभा निवडणूक जिंकतील- रामदेव बाबा

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आता येत्या काही तासांवर येऊन ठेपलेला असताना योगगुरु रामदेव बाबा यांनी मोठे भाकित वर्तवले आहे. जो पक्ष ही निवडणूक जिंकेल त्यांच्यात २०१९ची लोकसभा निवडणूक जिंकण्याची क्षमता असेल असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, २०१४च्या निवडणूकांपूर्वीही रामदेव बाबा यांनी भाजपाचे उघड समर्थन केले होते. त्यांच्या या भाकितामागे मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्षांचा संदर्भही असू शकतो. कर्नाटकच्या आज येणाऱ्या निकालानंतर राज्यात कोण सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट होईल. मात्र, त्यानंतर वर्षभरानंतर लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक सेमी फायनल मानली जात आहे. या निवडणुकीत ज्या पक्षाची कामगिरी चांगली असेल तोच पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत विजयाचा दावेदार असेल. कारण, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आपली सर्व शक्ती या निवडणुकीसाठी पणाला लावली होती. त्यामुळे कर्नाटकातील जनता मोदी-शहा यांच्या पाठीशी उभी राहते. की, सत्ताधारी काँग्रेसने आजवर केलेल्या कामावर विश्वास दाखवते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button