breaking-newsमहाराष्ट्र

शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग राबविल्याबद्दल सुनील तोटे यांचा ‘ब्रिक्स’कडून सन्मान

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सुनील तोटे यांना शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग राबविल्याबद्दल ब्रिक्सच्या ‘ब्रिक्स अलायन्स-बिझनेस फोरम’ तर्फे सन्मानित करण्यात आले. केंद्रीय प्रधानमंत्री कार्यालय राज्यमंत्री जितेंद्र सिंग व ‘ब्रिक्स अलायन्स-बिसनेस फोरम’च्या अध्यक्ष लरीसा झेलेंटसोवा यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

ताज डिप्लोमॅटिक एन्क्लेव मध्ये दिनांक 21 ते 23 मेपर्यंत ‘ब्रिक्स अलायन्स-बिझनेस फोरम’ च्या तीन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. आज समारोपीय समारंभात ब्रिक्स अलायन्समध्ये सामील असणाऱ्या देश-विदेशातील विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या ‘ब्रिक्स अलायन्स-बिझनेस फोरम’ च्या तर्फे सन्मानित करण्यात आले. यावेळी ‘ब्रिक्स अलायन्स-बिझनेस फोरम’ च्या वतीने देश-विदेशातील विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील सुनील तोटे यांचा यामध्ये समावेश होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button