breaking-newsराष्ट्रिय

कर्नाटकमध्ये जनता दलाची १० जागांची मागणी

देवेगौडा यांच्याशी राहुल गांधी यांची चर्चा

नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये धर्मनिरपेक्ष जनता दलाने लोकसभा निवडणुकीत किमान दहा जागांची मागणी केली आहे. यापूर्वी जनता दल १२ जागांसाठी आग्रही होते. राज्यात लोकसभेच्या २८ जागा आहेत. धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते व माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांची काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भेट घेतली.

कर्नाटमध्ये या दोन पक्षांचे सरकार आहे. जागावाटप १० मार्चला जाहीर केले जाणार आहे. राहुल गांधी व देवेगौडा यांनी दोन तास चर्चा केली. या भेटीत त्यांनी कर्नाटकमधील जागावाटप, देशातील राजकीय स्थिती त्यात विरोधकांच्या ऐक्याची गरज यावर चर्चा केली. चर्चेवेळी काँग्रसचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सरचिटणीस दानिश अली उपस्थित होते. आमची चर्चा झाली. बैठकीत मी दहा जागा मागितल्या असे देवेगौडा यांनी स्पष्ट केले. आता राहुल गांधीच अंतिम निर्णय घेतील असे देवेगौडा यांनी सांगितले. निवडणूक जिंकणे हेच आमचे उद्दिष्ट आहे असे त्यांनी स्पष्ट केले. काही मुद्दे वेणुगोपाल व मी ठरवू असे असे दानिश अली यांनी सांगितले. दोन तृतीयांश जागा काँग्रेस लढवेल, उर्वरित जागा जनता दलाकडे येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. जागानिहाय चर्चा आम्ही करू १० मार्चला त्याची घोषणा करू, असेही सांगितले.

कर्नाटकमधील काँग्रेसच्या बंडखोर आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

कलबुर्गी (कर्नाटक) : काँग्रेसचे बंडखोर आमदार उमेश जाधव यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत भाजपमध्ये प्रवेश केला. पंतप्रधानांची बुधवारी येथे सभा झाली. दोनच दिवसांपूर्वी जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. विशेष म्हणजे जाधव हे गुलबर्गा मतदारसंघातून काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या विरोधात लढण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये सामील झालो याचा अभिमान असल्याचे जाधव यांनी सांगितले. विशेष म्हणजे जाधव हे खरगे यांचे पुत्र प्रियंक यांना मंत्री केल्यावरून नाराज आहेत. इतरांची ज्येष्ठता डावलून खरगे यांच्या पुत्राला संधी दिल्याचा त्यांचा आरोप आहे. अर्थात, जाधव यांना अपात्र ठरविण्याची याचिका काँग्रेसने विधानसभा अध्यक्षांकडे केल्याने लोकसभा निवडणुकीपूर्वी ती बाब त्यांना अडचणीची ठरण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button