breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

धारावीच्या यल्लमा मंदिरात जबरी चोरी; मौल्यवान दागिन्यांसह दानपेटी लंपास

 

मुंबई | प्रतिनिधी 
धारावी परिसरातील महात्मा गांधीनगर येथील प्रसिद्ध माता यल्लमा देवी मंदिरात अनोळखी चोरट्यांनी जबरी चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या चोरट्यांनी मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश करून देवीच्या अंगावरील मौल्यवान दागिने, ८ तोळे वजनाचा चांदीचा हार आणि मंदिरातील दानपेटी असा ऐवज लुटून नेला आहे. या प्रकरणी धारावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश येथील लाखो भाविकांचे आराध्य दैवता असलेल्या यल्लमा देवीचे मुंबईच्या धारावीतही मंदिर आहे. या मंदिरात चोरी झाल्याने भाविकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button